ABP Majha Headlines : 5 PM : 30 सप्टेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

देशी गायींना 'राज्यमाता-गोमाता' म्हणून घोषित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय... सरकारच्या  निर्णयाचं विविध हिंदू संघटनांकडून स्वागत.......

मराठा आरक्षणाबाबत माजी न्यायमूर्ती शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल स्वीकारला, विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मंत्रिमंडळ बैठकीत ठाण्यातील मेट्रो, भुयारी मार्गांच्या प्रकल्पांसाठी मोठी तरतूद तर रमाबाई आंबेडकरनगर, कामराजनगरच्या पुनर्विकासाला गती देण्याचा निर्णय

सरकारी कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युईटीमध्ये मोठी वाढ.... ग्रॅच्युटीची मर्यादा १४ लाखांवरुन २० लाखांवर

मुख्यमंत्र्यांशी बैठकीनंतर आदिवासींचं आंदोलन तुर्तास स्थगित.. रखडलेल्या भरती प्रक्रियेवर निर्णयाबाबत आश्वासन मिळाल्याची झिरवळांची माहिती.

सदोष गणवेशावरून रोहित पवारांचा सरकारला इशारा तर सरकारच्या निर्णयामुळे महिला बचत गटाला रोजगार मिळाल्याचा केसरकरांचा दावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या मुंबई आणि नवी मुंबईच्या दौऱ्यावर.. आमदार, पदाधिकाऱ्यांसोबत साधणार संवाद... शिंदे, फडणवीस आणि पवारांसोबत रात्री करणार खलबतं... 

महाविकास आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीला  सुरुवात, तिढा असलेल्या 30 ते 35 जागांवर तोडगा निघण्याची शक्यता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram