औरंगाबाद : शरद पवारांच्या सभेवर अनिश्चिततेचं सावट, राष्ट्रवादीची धावपळ

Continues below advertisement
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उद्या (शनिवारी) नियोजित सभेला अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर स्टेज उभारण्यास मंजुरी नसल्यामुळे औरंगाबाद महापालिकेचं ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी राष्ट्रवादीची धावपळ सुरु आहे.

राष्ट्रवादीने मराठवाड्यात आयोजित केलेल्या हल्लाबोल यात्रेची सांगता उद्या औरंगाबादेत होणार आहे. मोर्चाला परवानगी असली तरी विभागीय आयुक्तांच्या कार्यालयाच्या रस्त्यावर सभा घेता येणार नाही. यावेळी शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे इतर नेते मंचावर उपस्थित राहतील.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram