अहमदनगर : गुंडेगावच्या जंगलाला आग, अडीच हजार हेक्टरवरील वनसंपदा खाक
Continues below advertisement
अहमदनगरमधल्या श्रीगोंदा आणि नगर तालुक्याच्या हद्दीतील गुंडेगाव जंगलाला भीषण आग लागली. सुमारे दोन ते अडीच हजार हेक्टरवरील जंगल आगीत भस्मसात झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. या भीषण आगीत जंगलातील वनसंपदा जळून खाक झाली आहे. काल संध्याकाळी सातच्या सुमारीस ही आग आगली. जंगलात आग लागल्याचं कळताच गुंडेगावच्या ग्रामस्थांनी आग विझवण्याचे प्रयत्न सुरु केले. शिवाय वनविभागाकडूनही तटपुंजा साधनासहीत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Continues below advertisement