अहमदनगर: कुकडी नदीच्या पाण्यात तीन मृतदेह
Continues below advertisement
अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा तालुक्यात 3 वेगवेगळ्या ठिकाणी कुकडी नदीच्या पाण्यात 3 मृतदेह आढळले आहे. त्यामुळं परिसरात एकच खळबळ माजली आहे. आज सकाळी स्थानिकांना हे मृतदेह आढळून आले. त्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. हे तीनही मृतदेह पुरुषांचे असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरु आहे. हत्या करुन हे मृतदेह पाण्यात टाकण्यात आले की पाण्यात बुडून यांचा मृत्यू झाला याचा आता पोलीस शोध घेत आहेत..
Continues below advertisement