एक्स्प्लोर

उद्धव ठाकरे, शरद पवार संजय राऊत यांच्या भेटीला, राऊतांना उद्या डिस्चार्ज मिळणार

संजय राऊत सोमवारी दुपारी लिलावती रुग्णालयात दाखल झाले. तिथे त्यांची एन्जिओग्राफी झाली, त्यात त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक असल्याचं आढळलं. त्यानंतर त्याची एन्जिओप्लास्टी झाली.

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना उद्या (13 नोव्हेंबर) लिलावती रुग्णालयात डिस्चार्ज मिळणार आहे. राऊत यांच्यावर कालच (11 नोव्हेंबर) एन्जिओप्लास्टी झाली. त्यानंतर आज त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर काढलं असून उद्या त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. त्यातच रुग्णालयातील रुममध्ये लिखाण करतानाचा संजय राऊत यांचा एक फोटो समोर आला आहे. लिलावती रुग्णालयातील अकरावा संजय राऊत यांच्यासाठी रिझर्व्ह करण्यात आला आहे. 24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. त्याचवेळी शिवसेनेने आपली वेगळी भूमिका घेण्याच्या दिशेने पाऊल टाकली. मात्र, गेल्या 18 दिवसांमध्ये संजय राऊतांनी आणि त्यांच्या पत्रकार परिषदांनी शिवसेनेची बाजू खंबीरपणे लावून धरली. परंतु काल दुपारी ते लिलावती रुग्णालयात दाखल झाले. तिथे त्यांची एन्जिओग्राफी झाली, त्यात त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक असल्याचं आढळलं. त्यानंतर त्याची एन्जिओप्लास्टी झाली. त्यामुळे त्यांना रुग्णालयातच राहावं लागलं. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची भेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी आज लिलावती रुग्णालयात संजय राऊत यांची भेट घेतली. 'सामना'तील अग्रलेख असो किंवा पत्रकार परिषद, यामार्फत संजय राऊत यांनी त्यांनी भाजपला कधीही शिवसेनेवर वरचढ होऊ दिलं नाही. शिवसेनेची खिंड त्यांनी एकाकी लढवली. परंतु काल त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. संजय राऊत यांच्यावर अँजिओप्लास्टी, लिलावती हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया शरद पवार संजय राऊतांच्या भेटीला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज (12 नोव्हेंबर) पक्षाच्या बैठकीआधी लिलावती रुग्णालयात जाऊन संजय राऊत यांची भेट घेतील. जवळपास 15 मिनिटांची ही भेट होती. यावेळी शरद पवार यांच्यासोबत आमदार रोहित पवारही होते. आशिष शेलार, मनोहर जोशी, छगन भुजबळही राऊतांच्या भेटीला भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही आज संजय राऊत यांची रुग्णालयात भेट घेऊन विचारपूस केली. या भेटीचे फोटोही समोर आले आहेत. आशिष शेलार हे वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. याशिवाय शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे देखील संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी लिलावतीमध्ये पोहोचले. रुग्णालयातून राऊत यांचं ट्वीट संजय राऊत सध्या रुग्णालयात असले तरी त्यांनी आपली भूमिका मांडण्याचं काही सोडलेलं नाही. राऊत यांनी आज सकाळी "हम होंगे कामयाब, जरुर होंगे, ही कविता ट्विटरवर पोस्ट केली. संजय राऊत रुग्णालयात असल्यामुळे ते आता शिवसेनेची भूमिका मांडणार नाहीत, असं वाटत असतानाच त्यांनी सकाळी ट्वीट करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. "लहरों से डर कर नौका पार नहीं होती, कोशीश करने वालों की कभी हार नही होती ।' बच्चन. हम होंगे कामयाब..जरूर होंगे.., असं ट्वीट राऊत यांनी केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
Share Market : अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांची दीड लाख कोटींची कमाई, बाजारातील तेजीचं नेमकं कारण काय?
अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raju Shetti : कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
कर्जमाफीआधीच मुख्यमंत्र्यांचा सत्कार; राजू शेट्टी म्हणाले, स्वतःची पाठ स्वतः थोपटून घेण्याचा प्रकार, कर्जमाफीच्या अंमलबजावणीवरून सरकारला दिला अल्टिमेटम
Share Market : अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांची दीड लाख कोटींची कमाई, बाजारातील तेजीचं नेमकं कारण काय?
अमेरिका-इराण संघर्ष वाढूनही शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांनी दीड लाख कोटी कमावले
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
मुलीला का मारलं विचारणाऱ्या आईला वीट अन् काठीने मारहाण; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, मुलीचा आक्रोश
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व करावं, आषाढीला आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
विलासरावांचा पुढाकार, मनमोहनसिंगाची धडपड; सोनम वांगचूकांची तब्येत खालवताच राजू शेट्टींना अण्णा आंदोलनाची आठवण
Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणताही प्रस्ताव आलेला नाही: सुप्रिया सुळे
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Shiv Puran: मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
मृत्यूपूर्वी मनुष्याला मिळतात 'हे' 10 संकेत, शिवपुराणातील असे वर्णन, जे कलियुगातही लोकांना आश्चर्यचकित करते, जाणून घ्या...
Embed widget