एक्स्प्लोर

पाण्यावरुन नाशिक-मराठवाडा संघर्ष पेटण्याची चिन्ह; भाजप आमदाराचा इशारा

पाण्यावरुन नाशिक आणि मराठवाडा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झालीय. नाशिकच्या मुकणे धरणातील पिण्याच्या पाण्याचं आरक्षण रद्द करण्याचं वक्तव्य राजशे टोपेंनी केलं होतं. त्यावर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुंबई : पाण्यावरुन नाशिक आणि मराठवाडा संघर्ष पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. कारण नाशिक जिल्ह्यातील पाण्याच्या एका थेंबालाही हात लावून देणार नाही, असा इशारा नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी दिलाय. नाशिकच्या मुकणे धरणातील पिण्याच्या पाण्याचं आरक्षण रद्द करण्याचं वक्तव्य राजशे टोपेंनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आमदार फरांदे यांनी हा इशारा दिलाय. पाण्यावरून नाशिक जिल्हा आणि मराठवाडा यांच्यातील संघर्ष पुन्हा पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. नाशिकच्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी मंत्री राजेश टोपेंसह मराठवाड्यातील सर्वच लोकप्रतिनिधींना आव्हान दिलंय. नाशिकच्या पिण्याच्या एक थेंब पाण्याला धक्का लावू देणार नाही, असा इशारा आमदारांनी दिलाय. नाशिकच्या पिण्याच्या पाण्याला धक्का लावण्यापेक्षा जायकवाडी धरणातून अवैधरित्या होणारा पाणी उपसा थांबवावा, असं आव्हान त्यांनी दिलंय. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिल असून गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनधिकृत पाणी उपसा होत असल्यान त्यांच्यावर कारवाईची मागणी केलीय. मराठवाडा पाणीप्रश्न : औरंगाबादमध्ये सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत गोंधळ नाशिक शहराची वाढती पाण्याची मागणी लक्षात घेत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मुकणे धरण बांधण्यात आलंय. त्यावर 260 कोटी रुपये खर्च करून जलशुद्धिकरण केंद्र आणि वितरण व्यवस्था कार्यान्वित करण्यात आलीय. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही, असा इशारा फरांदे यांनी दिलाय. मराठवाड्यातला पाणीप्रश्न गंभीर - मराठवाड्यातल्या मोठ्या 11 धरणांपैकी बहुतेक धरणे पूर्ण क्षमतेने भरत नाहीत. त्यामुळे मराठवाड्याला दुष्काळवाडा, टँकरवाडा अशी विशेषणे लागली आहेत. प्रत्येक निवडणुकीमध्ये मराठवाड्याचा पाणी प्रश्न प्रचार केला गेला. महाविकास आघाडी सरकारनं मराठवाड्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटावा म्हणून मराठवाडा वॉटरग्रीडची योजना निवडणुकीच्या तोंडावर जाहीर केली. पण या योजनेला देखील महाविकास आघाडी कात्री लावण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, मराठवाड्याचा पाणीप्रश्नी औरंगाबाद इथल्या हॉटेल अजिंठा आंबे सिटरमध्ये आमदारांची बैठक बोलवली होती. मराठवाड्यातल्या 55 आमदारांपैकी या बैठकीला केवळ 10 आमदार उपस्थित होते. यातील नऊ आमदार भाजपचे तर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट उपस्थित होते. तर काही वेळातच संजय शिरसाठ यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. यामुळेच या बैठकीत विद्यार्थ्यांनी आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त महिला आणि मुलांनी आमदारांना धारेवर धरलं. केवळ आमदरच नाही, तर मराठवाड्यातल्या 9 खासदारांपैकी एकही खासदार उपस्थित नव्हता. Marathwada Water Issue | औरंगाबादमध्ये सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत गोंधळ | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??

व्हिडीओ

Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi CJP Protest: राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
राजधानी दिल्लीत अघोषित लॉकडाऊन! पोलिसांच्या अभेद्य चिरेबंदीला अन् छावण्यांना सुद्धा न घाबरता जेन झी बॅनरसह जंतर मंतरवर सकाळपासूनच धडकली
Pune MPSC Protest: पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
पुणे MPSC आंदोलनाबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात दुसरा गुन्हा दाखल; नेमकं काय आहे कारण? शिवराज मोरेंसह या 5 नावांचा समावेश
CJP Protest: दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
दिल्लीत पोलिसांचा कडक पहारा, 75 रेल्वे रद्द, इंटरनेटही बंद; राजधानीत धडकण्यापूर्वी अभिजीत दिपके म्हणाले, 'जिथे अडवाल, तिथेच जंतर-मंतर...'
Delhi CJP Protest: सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
सीजेपीकडून दिल्लीत आरपारची लढाई सुरु केली असताना सोनम वांगचूक जंतर मंतर 2.0 मध्ये का सहभागी होणार नाहीत? नेमकं कारण काय सांगितलं??
Jalgaon Crime: ‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
‘काका, तुमचे पैसे पडलेत’; शेतकरी नोटा उचलण्यासाठी खाली वाकताच चोरट्यांनी दोन लाखांवर मारला डल्ला, जळगावात नेमकं काय घडलं?
Nagpur Crime: नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
नागपुरात मध्यरात्रीनंतर सशस्त्र दरोडा! वृद्ध महिलेवर लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करून सोन्याचे दागिने लंपास, गिट्टीखदानच्या अनंतनगरातील घटना
Totaladoh Dam Water Level : नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
नागपूरकरांनो पाणी जपून वापरा! तोतलाडोह धरणामध्ये ऑक्टोबर महिन्यातच मे महिन्यासारखी स्थिती, बाष्पीभवनाने चिंता वाढवली
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
CJP Protest Delhi LIVE Updates: दिल्लीत जंतर-मंतरवर आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांविरोधात CJP चं आंदोलन, राजधानीला छावणीचं स्वरुप
Embed widget