एक्स्प्लोर

शिवसेनेचे माजी नगरसेवक एम. के. मढवींवर तडीपारीची कारवाई,  ठाणे जिल्हा आणि मुंबई उपनगरमध्ये येण्यास बंदी

Deportation : नवी मुंबई पोलिसांकडून शिवसेनेचे माजी नगरसेवक एम. के मढवी यांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. त्यांना ठाणे जिल्हा आणि मुंबई उपनगरमध्ये येण्यास दोन वर्षांसाठी बंदी करण्यात आली आहे.

मुंबई : शिवसेनेचे (shiv sena ) माजी नगरसेवक एम. के. मढवी यांना तडीपार करण्यात आले आहे.  नवी मुंबई पोलिसांकडून कारवाई करत  मढवी यांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे.  मढवी हे उध्दव ठाकरे यांचे समर्थक असून दसरा मेळाव्यात देखील उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात त्यांचा उल्लेख केला होता.   

नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत मढवी यांना ठाणे जिल्हा आणि मुंबई उपनगरमध्ये पुढील दोन वर्ष येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मढवी यांच्यावर 18  गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये मारहाण , जीवे मारण्याची धमकी आणि आर्थिक फसवणूक, सणासुधीसारख्या संवेदनशील काळात दंगल घडवणे , खुनाचा प्रयत्न करणे,  खून करणे,  खंडणीसाठी धमकावणे ,  सार्वजनिक ठिकाणी मानवी जिवीतास धोका पोचवणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.  त्यामुळेच पोलिसांकडून त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.  

दरम्यान, गेल्याच आठवड्यात मढवी यांनी पोलिस उपायुक्त आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. शिंदे गटात सहभागी होत नसल्याने आपला एन्काऊंटर करू अशा धमक्या पोलिस देत असल्याचा गंभीर आरोप मढवी यांनी केला होता. त्यांच्या आरोपानंतर राजकीय वर्तुळाच एकच खळबळ उडाली होती. परंतु, आरोप केल्यानंतर अगदी एका महिन्याच्या आत त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.   

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंकडून उल्लेख 
5 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कवर शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या दसरा मेळाव्यात भाषण करताना शिवशेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात मढवी यांचा उल्लेख केला होता. एकनाथ शिंदे गटाकडून शिवसैनिकांना कशा प्रकारे त्रास दिला जातोय हे सांगत असताना मढवी यांचे उदाहरण उध्दव ठाकरे यांनी दिले होते.   

एन्काऊंटर करण्याच्या धमक्या दिल्याचा आरोप
एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून दबाव टाकला जात आहे. यासाठी पोलिस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याकडून एन्काऊंटर करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप एम. के. मढवी यांनी केला होता. एम. के. मढवी, विनया मढवी, करण मढवी असे तीघेजण शिवसेनेकडून नगरसेवक झाले होते. एकनाथ शिंदे गटात सहभागी न होता मढवी परिवार उध्दव ठाकरे यांच्या बरोबर कायम राहिला आहे. आपण शिंदे गटात सहभागी होत नसल्यानं आपल्या विरोधात पोलिस कारवाई करून तडीपारीच्या नोटीसा काढल्या आहेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी नगरसेवक विजय चौगुले यांचा हात असल्याचा आरोप मढवींनी केला होता. एवढेच नाही तर या आरोपानंतर पोलिस उपयुक्तांची बदली न झाल्यास आम्ही सहकुटुंब आत्महत्या करू, असा इशारा देत माझ्या कुटुंबीयांना काहीही झाल्यास याला सर्वस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक नेते विजय चौगुले, माजी आमदार संदीप नाईक आणि उपायुक्त विवेक पानसरे जबाबदार असतील असा इशाराही त्यांनी दिला होता. 

महत्वाच्या बातम्या

शिंदे गटात येण्यासाठी धमकावलं जातंय; ठाकरेंच्या बाजूनं असणाऱ्या एम. के. मढवींचा मुख्यमंत्र्यांसह, पोलीस उपायुक्तांवर गंभीर आरोप 

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
Embed widget