Zero Hour Full : राज ठाकरे प्रचारात उतरले तर महायुतीला फायदा होणार ?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour Full : राज ठाकरे प्रचारात उतरले तर महायुतीला फायदा होणार ?
राज्यभर गुढीपाडवा साजरा झाला.. पण सध्याच्या निवडणुकीच्या वातावरणात सर्वात जास्त उत्सुकता होती ती म्हणजे शिवतीर्थवरील राज ठाकरेंच्या पाडवा भाषणाची.. आतापर्यंत अनिश्चित भूमिकेचा पक्ष, अशी ओळख असलेल्या मनसेने यंदाच्या.. म्हणजेच २०२४ लोकसभा निवडणुकीत, मात्र एक स्पष्ट भूमिका घेतलीय.. 'भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी'च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा'.. स्वत: राज ठाकरेंनी ही घोषणा केली... २०१४मध्ये मोदींना पाठिंबा, त्यांनतर २०१९मध्ये 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत मोदींविरोधातला प्रचार.. आणि आता पुन्हा मोदींना पाठिंबा.. भूमिका बदलली जरी असली, तरी स्पष्ट मात्र आहे. पण एका वाक्यात असलेली हि भूमिका बरीच पुढची प्रश्न अनुत्तरित ठेवून गेलीय.. कालच्या सभेतून भलेही 'आम्हाला राज्यसभा नको, बाकीच्या वाटाघाटी नको.. हा पाठिंबा फक्त नि फक्त, नरेंद्र मोदींसाठी आहे.'.. असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलं.. मनसे महायुतीत सामील झाली आहे की नाही? मनसेला जागा सोडल्या जाणार आहेत ... ह्या लोक सभेत किंवा नंतर विधान सभेत?.. राज ठाकरे हे प्रचार करणार का?.. प्रचार करणार असल्यास, फक्त भाजपचा करणार? कि शिंदेंचाही? कि अजितदादांचाही? अमित शाहला राज ठाकरे दिल्लीत भेटायला गेले होते १९ मार्चला ... आज जवळजवळ २० दिवसानंतर एका वाक्याची भूमिका समोर आलीय ..