Zero Hour Nashik City | आपलं नाशिक स्मार्ट कधी होणार? चार-पाच वर्ष उलटूनही काम अपूर्णच ABP Majha
Zero Hour Nashik City | आपलं नाशिक स्मार्ट कधी होणार? चार-पाच वर्ष उलटूनही काम अपूर्णच ABP Majha
प्रशासकीय सेवेतील आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव व्ही. राधा यांच्या आदेशान्वये हे आदेश पारीत करण्यात आले आहेत. त्यामध्ये, पुण्याचे (Pune) जिल्हाधिकारी आणि माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या डॉ. सुहास दिवसे यांना पदोन्नती देत त्यांची बदली करण्यात आली आहे. दिवसे यांच्याजागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी (Collector) जितेंद्र डूडी यांना पदभार देण्यात आला आहे. तर, साताऱ्याच्या जिल्हाधिकारीपदी पुण्यातील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या आदेशान्वये राज्यातील 10 आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून काहींना पदोन्नती प्रमोशन देण्यात आलं आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांना पदोन्नती देण्यात आली असून भूमी अभिलेख विभागाच्या जमाबंदी आयुक्तपदी कररण्यात आली आहे. ''आपणांस भारतीय प्रशासन सेवेच्या अधिकालिक वेतन श्रेणीत (Level 14 of the Pay Matrix) पूर्वलक्षी प्रभावाने दिनांक 1 जानेवारी 2025 पासून पदोन्नती देण्यात येऊन, पदोन्नतीनंतर आपली नियुक्ती जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख, पुणे या रिक्त पदावर करण्यात येत आहे. आपल्या जागी जितेंद्र डूडी, भाप्रसे यांची नियुक्ती केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार जितेंद्र डूडी, भाप्रसे यांच्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार निरंजन कुमार सुधांशु, भाप्रसे यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा,'' असे परिपत्र जारी करण्यात आले आहे.