Zero Hour Mumbai BMC Election | निवडणुकीच्या राजकारणात मुंबईकरांची दखल कोण घेणार? ABP Majha

Zero Hour Mumbai BMC Election | निवडणुकीच्या राजकारणात मुंबईकरांची दखल कोण घेणार? ABP Majha

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मोठी तयारी सर्व राजकीय पक्ष करताना दिसत आहेत, अशातच पिंपरी चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. याबाबतची मोठी घोषणा भाजप आमदार शंकर जगतापांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाने आम्ही सगळ्या जागा लढण्याची रणनीती आखलेली आहे. लोकसभा आणि विधानसभेत असणारी महायुती पालिका निवडणुकीत तुटणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. पालिका आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीनंतर भाजपचे शहराध्यक्ष आणि आमदार शंकर जगतापांनी हे जाहीर केलं आहे. मात्र भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीत अजित पवारांचे शिलेदार नाना काटे उपस्थित असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. नाना काटे पालिकेची निवडणूक कमळाच्या चिन्हावर लढणार का? अशी चर्चा ही यानिमित्ताने रंगलेली आहे. 

नेमकं काय म्हणालेत शंकर जगताप?

गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून प्रशासनाच्या माध्यमातून जी काही जनतेची कामे थांबली आहेत, म्हणून आम्ही सर्वजण महानगर पालिकेतील माजी नगरसदस्य शहरातील पाणी, रस्ते, विकास आणि इतर कामांसाठी आयुक्तांकडे आलो होतो. त्याबाबत सकारात्मक चर्चा झाली, शहरातील सर्वात महत्त्वाचा वाहतूक कोंडीचा मार्ग सोडवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, पाण्याचा आणि विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही गेलो होते. या बैठकीला उपस्थित असलेले सर्वजण सामान्यांचे प्रश्न सोडवण्याची कामे करतात. सध्या लोकप्रतिनिधी नसल्यामुळे आमच्या या नगरसदस्यांकडे लोक येतात. जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही याठिकाणी आलो आहोत, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola