Zero Hour : Guest Center | भुजबळ, देवेंद्र फडणवीसांमध्ये भेट होणार, लक्ष्मण हाके काय म्हणाले?
Zero Hour : Guest Center | भुजबळ, देवेंद्र फडणवीसांमध्ये भेट होणार, लक्ष्मण हाके काय म्हणाले?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मंत्रिमंडळ बैठकीसंदर्भात पत्रकारांना माहिती दिली. आमदार सुरेश धस हे माध्यमांशी संवाद साधत असतानाच देवेंद्र फडणवीस आले, त्यावेळी धस यांनी मागे होऊन मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, बीडची (beed) घटना, विरोधकांचे आरोप, मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय यासंदर्भात माहिती दिली. तसेच, पायाभूत सुविधांसाठी युनिक आयडी केला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. आधार हा जसा एका व्यक्तीचा युनिक आयडी असतो, तसाच युनिक आयडी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी तयार करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. अनेक विभाग एकाच ठिकाणी एकाच प्रकारची विकास कामे करतात. त्यातून तीच ती कामे होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. आधार क्रमांकामुळे जसे अनेक बोगस लाभार्थी आणि तीच ती नावे वगळली गेली, तसेच या निर्णयामुळे त्याच त्या विकास कामांची पुनरावृत्ती टाळता येणार आहे. यातून विकास कामांचे सुयोग्य नियोजन व्हावे आणि त्यात सुसूत्रता असावी, यासाठी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पाला युनिक आयडी असावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.