Zero Hour Full : कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour Full : कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?
एसआयटीनं ताब्यात घेतल्यानंतर आज वाल्मिक कराडला पुन्हा एकदा केजच्या विशेष न्यायालयासमोर हजर केलं.. तिथं एसआयटीकडून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येसंदर्भात तपास समोर आलेल्या बाबी कोर्टासमोर मांडण्यात आल्या.. आणि सगळ्यात मोठी आणि महत्वाची बाब होती.. ती म्हणजे संतोष देशमुख हत्येचे आरोपी असलेल्या विष्णू चाटे आणि इतर आरोपींचा थेट वाल्मिक कराडशी संबंध असल्याचंही एसआयटीनं कोर्टासमोर सांगितलं.. याशिवाय कोणकोणत्या बाबी कोर्टासमोर आल्यात.. आणि कोर्टात काय झालं.. हेही आपण आजच्या भागात पाहणार आहोत..
त्याचबरोबर परळीसह वाल्मिक कराडच्या मूळगावी कालपासून पेटलेलं आंदोलन आजही सुरु होतं.. जमावबंदी असतानाही परळीत सकाळपासून आंदोलनं सुरु होतीच.. कराडला कोठडी सुनावल्यानंतर त्याचं मुळगाव असलेल्या पांगरीत महिला आणि समर्थक आक्रमक झाले... त्यांनी थेट राष्ट्रीय महामार्गावरच ठिय्या मांडत, घोषणाबाजीला सुरुवात केली.. यावेळी काही महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला... मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना अटकाव केला.. तर काही महिलांनी आक्रोश करत अन्याय होत असल्याचा आरोप केलाय.. याशिवाय कराड समर्थकांनी रस्त्यावर टायर पेटवून रास्तारोको करण्याचा प्रयत्न केलाय.. याशिवाय आणखी कोणकोणत्या ठिकाणी आंदोलनं झाली.. हे सगळं झीरो अवरमध्ये आपण पाहणार आहोत.. मात्र, सुरुवात विरोधकांच्या आरोपांनी.