Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावा

Continues below advertisement

Rajkiya Shole Pangri Walmik Karad : वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावा 
बीड : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाच्या चौकशीसाठी वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) पोलीस कोठडीची मागणी एसआयटी पथकाने केली होती. त्यानुसार, बीड सत्र न्यायलायाने मकोका गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर, आरोपी कराडला कोर्टातून (Court) पोलीस व्हॅनमध्ये नेत असताना कोर्टाबाहेर चांगलाच राडा पाहायला मिळाला. वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ अनेकांनी घोषणाबाजी केली, तर काहींनी वाल्मिक कराडला विरोधाही घोषणाबाजी केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला कार्यकर्त्या अॅड. हेमा पिंपळे यांनी घोषणाबाजी करत गृहमंत्र्यांनी बीड (Beed) जिल्ह्यात यावं, असं म्हटलं. तर, काही वकिलांनीही संविधानाचा दाखला देत वाल्मिक कराडवर चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आल्याचं म्हटलंय. त्यामुळे, बीडच्या कोर्टाबाहेरच राडा पाहायला मिळाला.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram