Zero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढले
जयदीप मेढे | 15 Jan 2025 11:42 PM (IST)
पुणे शहराला निसर्गानं सुंदर वरदान दिलंय.. ते वरदान म्हणजे टेकड्या. पण अलीकडच्या काळात या टेकड्या सामान्य पुणेकरांसाठी जीवघेण्या ठरू लागल्या आहेत. त्यात निसर्गाचा काहीच दोष नाही, दोष आहे आपलाच. अनेक टेकड्यांवर समाजकंटकांनी उच्छाद मांडलाय.
लैंगिक अत्याचार, मारहाण, चोऱ्या अशा घटनांमुळे टेकडी म्हटलं की अनेक पुणेकरांच्या मनात धडकी भरतेय. यामागची कारणं काय, आणि त्यावर प्रशासन काही उपाययोजना करतंय का, याचा वेध घेणारा हा आमचा स्पेशल रिपोर्ट.