Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणी

Continues below advertisement

Mahakumbh 2025: IIT Bombay चा एरोस्पेस इंजिनिअरकसा बनला साधू? UNCUT कहाणी 

प्रयागराज : सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभमेळा चालू आहे. या महाकुंभमेळ्यात देशातील कानाकोपऱ्यातून भाविक त्रिवेणीसंमगावर पवित्र स्नान करण्यासाठी येत आहेत. यासह या कुंभमेळ्यात स्नानासाठी येणारे साधू सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. काही दिवसांवूर्वी एका सुंदर तरुणीने अध्यात्माकडे जात असल्याचे सांगत होते. याच महाकुंभमेळ्यात डोक्यावर एक पक्षी असलेला साधू सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होता. असे असतानाच चक्क आयआयटीचे शिक्षण घेतलेला साधू समोर आला आहे. या उच्चशिक्षित साधूची सध्या जगभरात चर्चा आहे. 

आयआयटी बॉम्बेमधून इंजिनिअरिंगचे शिक्षण

सध्या चर्चेत आलेले हे तरुण साधू उच्चशिक्षित आहेत. त्यांनी आयआयटी बॉम्बेमधून एअरोस्पेस इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेले आहे. सोबतच फोटोग्राफीची आवड असल्यामुळे त्यांनी व्ह्युज्यूअल कम्यूनिकेशनचेही शिक्षण घेतलेले आहे. मात्र कशातही शांती, सुख, समाधान न मिळाल्याने शेवटी या तरुणाने साधू होण्याचा निर्णय घेतला. या तरुण साधूने स्वत:च त्याची ही कहाणी सांगितली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram