Zero Hour ABP Majha:भाजपचं गाव चलो अभियान ते प्रकाश आंबेडकर मविआ बैठकीला हजर ; झीरो अवरमध्ये चर्चा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppZero Hour ABP Majha:भाजपचं गाव चलो अभियान ते प्रकाश आंबेडकर मविआ बैठकीला हजर ; झीरो अवरमध्ये चर्चा बातमी आहे इंडि आघाडीची.. काँग्रेसमध्ये दम असेल तर त्यांनी वाराणसीतून किंवा प्रयागराजमधून भाजपला हरवून दाखवावं असं ओपन चॅलेंज दिलंय. पश्चिम बंगालमधील जागावाटपावरुन काँग्रेस आणि ममता यांच्यात वाद सुरु आहे. आपण काँग्रेसला लोकसभेच्या दोन जागा सोडल्या होत्या पण त्या त्यांना नको आहेत असं सांगत चिडलेल्य़ा ममता बॅनर्जींनी काँग्रेसला चॅलेंज दिलं. आपल्याला माहिती आहेच की वाराणसीतून गेले दोन टर्म पंतप्रधान नरेंद्र मोदी पावणे चार लाख आणि पावणे पाच लाख मताधिक्यानं निवडून आले होते. आताही ते आरामात हॅटट्रिक साधतील असं चित्र आहे. ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांच्यावरही नाव न घेता टीका केली. काही लोक फक्त फोटो सेशन करण्यासाठी बंगालमध्ये येतात असं त्या म्हणाल्या, त्यांचा सगळा रोख राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेकडे होता हे उघड आहे. नितीशकुमार इंडि आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आघाडीसाठी सर्वात महत्वाच्या व्यक्ती ममता बॅनर्जी आहेत आणि त्या सुद्धा नाराज आहेत..
या अपडेट्ससह वेळ झालीय इथेच थांबण्याची.. सोमवारी रात्री ७.५६ वाजता पुन्हा भेटू..
माझा कट्टा लगेच सुरु होतोय, बिहार आणि राजस्थानमधील सत्ता बदल जवळून पाहणारे विनोद तावडे कट्ट्यावर आहेत.. त्यामुळे कुठेही जाऊ नका पाहात राहा एबीपी माझा