Saif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वार
Saif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वार
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan Attack) याच्यावर चाकू हल्ला झाला. मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने सैफ अली खानच्या हातावर आणि पाठीवर वार केले. सध्या सैफ अली खानची तब्येत ठीक असून लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहे. सदर घटनेनं बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.
अज्ञात व्यक्ती सैफ अली खानच्या घरात शिरल्याचे सुरुवातीला काम करणाऱ्या मोलकरणीने पाहिले. अज्ञात व्यक्तीने सुरुवातील मोलकरणीच्या हातावर चाकून वार केले. यानंतर मोलकरणीने आरडाओरडा केल्यानंतर सैफ अली खान बाहेर आला. सैफ अली खानने अज्ञात व्यक्तीच्या हातात चाकून आणि मोलकरणीचा हात रक्ताने माखल्याचे पाहून तो तिच्या मदतीसाठी धावला. यावेळी आरोपी आणि सैफ अली खानमध्ये झटापट झाली. त्यावेळी आरोपीने हातातील चाकूने सैफवर सहा वार करत पळ काढल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सैफ अली खानवर मुंबईतील लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया-
सैफ अली खानवर मुंबईतील लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली असून चाकूने त्याच्यावर 6 वार करण्यात आलेत. या हल्ल्यामध्ये त्याला 10 सेंटीमीटरची जखम झाली. अज्ञात व्यक्तीकडून सैफ अली खानच्या हात आणि पाठीवरही वार करण्यात आले. पाठीत धारदार शस्त्र खुपसलं असून सैफवर पहाटे शस्त्रक्रिया करण्यात आली. दरम्यान वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केलीय.