Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोन

Continues below advertisement

Supriya Sule Saif ALi Khan : सैफ अली खानवर चाकू हल्ला, सुप्रिया सुळेंचा करिश्मा कपूरला फोन

बॉलीवूड इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेता सैफअली खान याच्यावर बुधवारी रात्री राहत्या घरी एका चोराने धारदार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये सैफ अली खान याला गंभीर दुखापत झाली आहे. चोराने सैफच्या मानेवर आणि पाठीवर वार केल्याचे समजते. त्याच्या मानेवर 10 सेंटीमीटरची खोल जखम झाली आहे. तर धारदार पाते त्याच्या पाठीत रुतून राहिले होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. रात्री अडीच वाजता हा प्रकार घडल्याचे समजते. आज सकाळी या घटनेची माहिती समोर आली तेव्हा खासदार सुप्रिया सुळे या पुण्यातील एका कार्यक्रमात होत्या. त्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने सैफच्या कुटुंबीयांना फोन केला.

सुप्रिया सुळे सैफच्या कुटुंबीयांशी फोनवर बोलत असतानाचा संवाद 'एबीपी माझा'च्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फोनवरील व्यक्ती नेमकी कोण होती, हे समजू शकलेली नाही. मात्र, ही व्यक्ती करिना कपूरची बहीण करिश्मा कपूर असावी, असा अंदाज आहे. सुप्रिया सुळे यांनी फोनवरील व्यक्तीला सांगितले की, बेबो आणि सैफला सांग मी फोन केला होता. काय होतंय, ते मला सांगत राहा. काळजी घ्या. मी काही मदत करु शकत असेन तर मला सांगा, असे सुप्रिया सुळे यांनी फोनवरील व्यक्तीला सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram