Special Report | 34 दिवस, 12 बळी, एक जबडा.. 12 निष्पापांचा बळी घेणारा बिबट्या जेरबंद कधी होणार?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Dec 2020 11:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकरमाळा तालुक्यात तीन जणांचे बळी घेतलेल्या नरभक्षक बिबट्या ने आज दुपारी बाराच्या सुमारास नरसोबावाडी सांवी जवळ शेतात काम करणाऱ्या दिनकर पाटील यांच्या पत्नी वर झडप मारली यावेळी त्यांनी बिबट्याची झडप चुकवली यावेळी उपस्थित असलेल्या लोकांनी दगडाचा भडीमार नरभक्षक बिबट्यावर केल्यानंतर बिबट्या तिथून पळून गेला. यानंतर बिबट्या रामचंद्र महादेव कदम यांच्या उसाच्या शेतात गेला दुपारी दीड वाजल्या नंतर ही बातमी वन विभाग अधिकाऱ्यांना त्यांना कळल्यानंतर व सत्तर-ऐंशी कर्मचाऱ्यांनी या उसाच्या पाच एकराच्या फडाला घेराव घातला असून शार्प शूटर सायंकाळी सहाच्या पुढे उसाच्या फडात घुसले आहेत रात्री 9 वाजेपर्यंत विभागाने प्रयत्न करून त्याला जेरबंद करण्याच नियोजन केले पण त्यांना यश आले नाही.