Parbhani Violence : परभणीमधील जाळपोळ - तोडफोडीत छोट्या व्यापाऱ्यांना फटका
परभणीतील परिस्थिती सध्या नियंत्रणात असून शहरासह जिल्हाभरात शांतता आहे. सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर काल पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागलं होतं. आज परिस्थिती नियंत्रणात आली आहे. नांदेड परिक्षेत्राचे आयजी शहाजी उमप परभणीत ठाण मांडून आहेत. दरम्यान काल रात्री उशिरापर्यंत ४० पेक्षा जास्त लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महत्त्वाचं म्हणजे आज शहरातील व्यापारी अकरा वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.
परभणी शहरांमध्ये संविधानाच्या पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना झाली विटंबना करणाऱ्याला जमावाने ताब्यात घेऊन चोप दिला होता व पोलिसांनीही त्याला अटक अटक करून गुन्हा दाखल केलेला काल सर्वांनी एकत्र येवून शांततेत बंद करणार असल्याचा प्रशासनाला कळवलं होतं मात्र तसं झालं नाही आज हिंसा झाली ज्या काही लोकांनी हिंसा केलेली आहे अशा आतापर्यंत 40 जणांना आम्ही ताब्यात घेतले असून पोलीस नियमानुसार कारवाई करणार असल्याची माहिती नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी दिली आहे.