City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 12 डिसेंबर 2024 : 07 PM ABP Majha

Continues below advertisement

City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 12 डिसेंबर 2024 : 07 PM ABP Majha

भिवंडी शहरालगतच्या खोणी खाडीपार ग्रामपंचायत परिसरात NIAची कारवाई, पथकाने एकाला घेतलं ताब्यात, पाकिस्तानमध्ये देशविरोधी संघटनेशी संपर्क असल्याचा संशय.

छत्रपती संभाजीनगर शहरात एनआयएची कारवाई, बीड बायपास भागात असलेल्या मदरशातून २२ वर्षीय तरुण ताब्यात, तरुणांकडून तीन मोबाईल जप्त. 

एनआयएच्या टीमकडून अमरावतीत एकजण ताब्यात, अमरावतीच्या छायानगर परिसरात कारवाई, हा युवक पाकिस्तानमधील संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती.

बीडच्या विशाल डिस्ट्रीब्युटर्सकडून बोगस औषधांचा ससूनमध्येही पुरवठा, बोगस औषधांचा प्रकार लक्षात येताच औषधांचा वापर थांबवला, अन्न आणि औषध प्रशासनाकडून औषधांची तपासणी. 

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा, बनावट औषधांचा साठा सील. 

शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार भाऊबीजेची सुट्टी, दरवर्षी मिळणाऱ्या एकूण 24 सुट्ट्यांमध्ये आता आणखी एका सार्वजनिक सुट्टीची भर.

MPSC च्या वतीनं होणारी समाज कल्याण विभागासाठीची भरती परीक्षा २५ डिसेंबरला, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी परीक्षा होणार असल्यानं विद्यार्थी संघटनेचा विरोध, मात्र परीक्षा घेण्यावर MPSC ठाम. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram