ABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
भारताला तब्बल 12 वर्षांनी गवसला बुद्धिबळाचा नवा राजा, डी, गुकेशची विश्व बुद्धिबळ फायनलमध्ये डिंग लिरेनवर मात, साडेसात गुणांसह विश्वविजेतेपदाला गवसणी
दिल्लीत अमित शाह शरद पवारांची भेट घेणार.... वाढदिवसांच्या शुभेच्छा देण्यासाठी संसदेत अमित शाह शरद पवारांना भेटणार
दिल्लीत शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी घेतली भेट...सुनेत्रा पवार, पार्थ, जय पवार, प्रफुल्ल पटेल आणि भुजबळही उपस्थित...सुप्रियांनी केलं कौतुकानं स्वागत...
दिल्लीत अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला फायनल, भाजपचे २० शिंदेचे १२ तर अजित पवारांचे होणार १० मंत्री...१४ तारखेला मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता...
मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचाच वरचष्मा राहणार, सूत्रांची माहिती...गृहखात्यासह सर्व प्रमुख खाती भाजपकडे, नगरविकास शिवसेनेला मिळण्याची शक्यता...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत घेतली पंतप्रधान मोदींची भेट, मुख्यमंत्री शपथविधीनंतर पहिलीच भेट, पंतप्रधानांना दिली अश्वारुढ शिवरायांची प्रतिमा
एक देश एक निवडणूक विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी, पुढील आठवड्यात विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता
विरोधी पक्षनेतेपदासाठी अजून प्रस्तावच आला नसल्याची विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांची माहिती, सभागृहात विरोधकांचा आवाज न दाबण्याची ग्वाही