Vitthal Pooja Maan Special Report कार्तिकीला विठ्ठलपूजेचा मान कुणाला द्यायचा?, फडणवीस की अजित पवार?
abp majha web team
Updated at:
04 Oct 2023 11:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपंढरपुरात कार्तिकीची यात्रा पुढच्या महिन्यात आहे. त्याचे वेध वारकऱ्यांना लागलेत. पायी दिंडी, टाळ-मृतुंगाचा ताल आणि अभंगाची गोडी... अशा या कार्तिकी एकादशीला विठ्ठलाची पूजा करण्याचा मान उपमुख्यमंत्र्यांना असतो. आणि याला तब्बल ३५ वर्षांची परंपरा आहे. यंदा मात्र दोन उपमुख्यमंत्री असल्याने, कुणाच्या हाती देऊ झेंडा? असा प्रश्न मंदिर समितीला पडलाय... पाहूयात, याबाबत समिती आता पुढचं कोणतं पाऊल उचलणारेय?