Vidhan Parishad Election : विधान परिषदेसाठी साटंलोटं! कुठे बिनविरोध तर कुठे निवडणूक..
abp majha web team
Updated at:
26 Nov 2021 11:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : विधानपरिषद निवडणुकीत आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप आणि काँग्रेसमध्ये साटंलोटं पाहायला मिळालं. दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत कोल्हापूर, धुळे आणि मुंबईत बिनविरोध निवड करण्यावर एकमत झालं. त्यानुसार कोल्हापूरात भाजपच्या अमल महाडिक यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे राज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. तर त्याबदल्यात धुळ्यात काँग्रेस उमेदवारानं माघार घेतल्यानं भाजपच्या अमरिश पटेल यांची बिनविरोध निवड निश्चित झाली.