Zero Hour Amit Thackeray Mahim Vidhan Sabha : दुसरे तरुण ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात

Continues below advertisement

Zero Hour Amit Thackeray Mahim Vidhan Sabha : दुसरे तरुण ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात
अमित ठाकरेंच्या रुपानं ठाकरे घराण्यातील दुसरी व्यक्ती आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. २०१९ साली आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. उद्धव ठाकरे हेही आमदार आहेत, पण त्यांनी विधान परिषदेचा मार्ग निवडला होता, म्हणजे प्रत्यक्ष जनतेतून निवडून येण्याचा मार्ग त्यांनी तेव्हाही स्वीकारला नव्हता. 
अमित ठाकरेंना तिकीट मिळालं तर महायुती किंवा ठाकरेंची शिवसेना उमेदवार देणार नाही अशा चर्चा मध्यंतरी सुरू होती. मात्र तसं झालं नाही. माहीममधून शिंदेंच्या शिवसेनेनं विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या, कारण लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी पंतप्रधानपदासाठी मोदींना पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळं मनसेचा एकही उमेदवार लोकसभेच्या रिंगणात नव्हता. तसंच दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात महायुतीच्या राहुल शेवाळे यांना माहीम मतदारसंघात आघाडी मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरेंना प्रश्नही विचारण्यात आला, पाहूयात त्यांनी काय उत्तर दिलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram