अवकाळी पावसाचा नाशिकच्या शेतकऱ्यांना फटका, पिंकांवर बुरशी, करपा रोगांचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Dec 2020 09:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सध्या थंडीचे दिवस आहेत. पण गेल्या तीन दिवसात नाशिकमध्ये ऐन थंडीत पाऊस कोसळतोय. पण वातावरणातील या सगळ्या बदलांचा सगळ्यात मोठा फटका बसलाय तो बळीराजाला. द्राक्षनगरी असलेल्या नाशिकमधील द्राक्ष उत्पादक शेतकरी सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे हवालदिल झाले आहेत. द्राक्षपिकाशिवाय टोमॅटो, डाळींब आणि अन्य पिकांचं उत्पादन घेणारे शेतकरीही अडचणीत सापडले आहेत.