Top 80 at 8AM 22 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

Continues below advertisement

Top 80 at 8AM 22 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांच्या दोन मुलांमधला वाद कोर्टात, उद्योग समुहाचा लोगो वापरण्यावरुन दोन सख्खे भाऊ कोर्टात आमने-सामने 

सीआयडी कस्टडी संपत असल्याने वाल्किम कराडला आज बीड कोर्टात हजर करणार, सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीची शक्यता 

रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी महेंद्र थोरवेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, सहपालकमंत्रिपद नको, पालकमंत्रीपदच हवं, थोरवेंची मागणी, तर शिंदेंचा निर्णय मान्य असेल, गोगावलेंची प्रतिक्रिया 

उद्धव ठाकरे आणि शरद पवार लवकरच भाजपसोबत केंद्रात जातील, प्रहारच्या बच्चू कडूंचा खळबळजनक दावा, तर शिंदे आणि अजित पवारांची गरज भाजपसाठी संपली, कडूंचं वक्तव्य 

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ महाराष्ट्र सदन प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा,   भुजबळांच्या जामीनाला ईडीने दिलेलं आव्हान फेटाळलं.. हायकोर्टाने दिलेला जामीन योग्य असल्याचा निर्वाळा

बिल्डरचा नाहक छळ केल्यामुळे मुंबई हायकोर्टाकडून ईडीला एक लाखाचा दंड, कायद्याचा गैरवापर करुन त्रास देणं बंद करण्याची तंबी.. बिल्डरची ईडीकडे तक्रार करणाऱ्यालाही ठोठावला दंड 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram