Walmik Kard Wife Property : बीडच्या मांजरसुंबा इथे कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे 9 एकर जमीन

Continues below advertisement

Walmik Kard Wife Property : बीडच्या मांजरसुंबा इथे कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावे 9 एकर जमीन

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन आरोपांच्या अटकेसाठी पुढाकार घेतलेल्या भाजप आमदार सुरेश धस (Suresh dhas) यांनी बीड (Beed) जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि परळीत होत असलेल्या अवैध धंद्यावरूनही बीडमधील दोन्ही मंत्र्‍यांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं. तसेच, संतोष देशमुख हत्याप्रकरणात वाल्मिक कराड हेही खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता, दीड वर्षांपूर्वी परळीत झालेल्या एका खुनाचा दाखला देत धस यांनी प्रश्न उभे केले आहेत. विशेष म्हणजे हे प्रकरण दाबण्यासाठी आका आणि इतर सहकाऱ्यांनी पोलिसांवर दबाव आणला होता, असा गौप्यस्फोटही धस यांनी केला. तर, संतोष देशमुख हत्याप्रकरणात मी जे आरोप केले त्याचे पुरावे एसआयटीनं पुढे आणले आहेत, आकाचा संबंध आहे हे स्पष्ट होत असल्याचंही समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरुन ते म्हणाले. 

अवादा कंपनीच्या शिंदेंना पाथर्डीपर्यंत नेलं होतं आणि मारत आणलं होतं, त्याचे सीसीटीव्ही फुटेज आहे. या सीसीटीव्हीमध्ये आका, चाटे, घुले हे आहेत हे स्पष्ट दिसतंय. याप्रकरणात पीआय पाटील याला सहआरोपी केलं पाहिजे, महाजन बडतर्फ केलं पाहिजे, गर्जेंना बडतर्फ केलं पाहिजे, किंवा गडचिरोलीला पाठवलं पाहिजे, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी केलीय. संतोष देशमुख हत्याप्रकरणात आत्तापर्यंत ७-८ झालेत, आता नववा देखील टाकला पाहिजे. तो मी नव्हेच म्हणणारा, हा मी आहेच हे तुम्हाला दिसलं ना, मी जे बोललो त्याला पुष्टी मिळाली आहे. अजून बरेच आरोपी आहे, बंदोबस्त व्हावा अशी मागणी आहे, रितसर नावं देऊ आणि एसआयटी तुम्हाला कळवेल, असेही धस यांनी म्हटले. यावेळी, परळीतील दीड वर्षांपूर्वीच्या खुनाच्या घटनेवरही त्यांनी भाष्य केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram