Thackeray Brothers Yuti ठाकरे बंधुंचं एकत्र येणं लांबणीवर, पालिकेसाठी महायुतीला Raj Thackeray हवेत?
पवार काका-पुतणे एकत्र येणार का? राज-उद्धव हे ठाकरे बंधू एकत्र येणार का? या दोन प्रश्नांचं उत्तर देणं सध्या तरी कोणालाही शक्य नाही. ठाकरे बंधुमधली दरी तर वाढतेय की कमी होतेय ते भल्या भल्यांना कळत नसेल. राज ठाकरेंकडे महायुतीच्या नेत्यांचं येणं जाणं सुरुच आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंनी घातलेली पहिल्याच अटीला राज ठाकरेंनी केराची टोपली दाखवली आहे. तिकडे उद्धव ठाकरे शरद पवारांपासून दूर जातायत का असा प्रश्न संजय राऊतांना विचारला जातोय. काय सुरु आहे ठाकरेंचं पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबतच्या, भाजपसोबतच्या भेटीगाठी बंद केल्या तरच विचार करु अशी अट उद्धव ठाकरेंनी टाकली होती.
राज ठाकरेंनी मात्र त्या अटीशर्थींना थेट केराची टोपली दाखवली, आणि असं म्हणायचं तात्कालिक कारण आहे
मंत्री उदय सामंत यांनी घेतलेली राज ठाकरेंची भेट. उदय सामंत यांची शिवतीर्थवर जाण्याची ही तिसरी वेळ.
खिचडी खाल्ल्याचं सांगत उदय सामतांनी उद्धव ठाकरेंना टोला मारुन घेतला.
उदय सामंत यांनी चहाखिचडीवर वेळ मारुन नेली असली तरी संजय राऊतांनी मात्र त्यावरुन थेट टॉपचा गियर टाकलेला दिसला. राज ठाकरेंना गोंजारतानाच त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेवर प्रहार केले. परदेशात उन्हाळी सुट्टीवर जाण्याआधी राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना मुलाखत दिली होती, तिथून खरंतर या ठाकरे एकिकरणाची चर्चा पुन्हा सुरुवात झाली. मनसे कडून मात्र
सावध पवित्रा घेणंच सुुरु आहे.
All Shows


































