Sunil Kamble Special Report : पदाधिकारी, पोलिसाला चापट मारली, नंतर आमदार सुनील कांबळे म्हणतात
abp majha web team Updated at: 05 Jan 2024 11:22 PM (IST)
आमदार... लोकांनी निवडून दिलेला, लोकांसाठीचा लोकसेवक... अडी नडीला ज्याच्याकडे जावं, आपल्या समस्या मांडाव्यात असं मतदारांचं हक्काचं ठिकाण... हेच लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या प्रचारात मान वाकून, चेहऱ्यावर आर्जवाचे भाव घेऊन दारात येतात... मतांसाठी हात जोडतात... आणि निघून जातात... मात्र, निवडून आल्यावर हेच जोडलेले हात सुटत असतील आणि ते सामान्य जनतेवर आणि पोलिसांवर उगारले जात असतील तर... एकच प्रश्न पडतो... अशा मारकुट्या आमदारांचं करायचं काय? पाहूयात... पुण्यात नेमकं काय घडलंय...