Breaking News LIVE : टेस्टिंगला सहकार्य करा, अन्यथा कठोर पाऊलं उचलावी लागतील; कल्याण डोंबिवली मनपा आयुक्तांचा इशारा

Breaking News LIVE Updates, 8 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Mar 2021 10:55 PM
नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून दरवर्षी घेण्यात येणाऱ्या JEE Main 2021 फेब्रुवारी सेशनचा परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 26 ते 28 फेब्रुवारी 2021 दरम्यान देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची खबरदारी घेऊन ही परीक्षा घेण्यात आली. यासोबतच JEE Main 2021 परीक्षेचा फेब्रुवारी सेशनचा निकाल अवघ्या दहा दिवसांमध्ये जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षी तीन भाषांमध्ये घेण्यात येणारी ही परीक्षा यावर्षी तेरा भाषांमध्ये घेण्यात आली होती.
देशभरातून 6 लाख 20 हजारांच्या जवळपास विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. त्यातील सहा विद्यार्थी हे देशातून या परीक्षेत 100 पर्सेंटाइल (NTA score) मिळवून टॉपर आले आहेत. यामध्ये महाराष्ट्रतून सिद्धार्थ मुखर्जी या विद्यार्थ्याने सुद्धा या सहा टॉपर्समध्ये आपले स्थान मिळवले आहे. याशिवाय संकेत जहा, (राजस्थान) ,प्रवीण कटारिया (दिल्ली ),रंजीम दास (दिल्ली) ,गुरमीत सिंग (चंदिगड) ,अनंत किंदबी (गुजरात) या विद्यार्थ्यांनी सुद्धा 100 पर्सेंटाइल गुण मिळवून देशात टॉपर्सचे स्थान मिळवले आहे.
कल्याण डोंबिवलीतील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन आणखीच सतर्क झालं आहे. कल्याण डोंबिवलीतील कोरोनाच्या रोजच्या आकड्यांनी गेल्या 3 आठवड्यात 80 वरुन आता सुमारे पावणे तीनशेचा आकडा गाठला आहे. गेल्या आठ दिवसात 1705 रुग्णांची भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर टेस्टिंग आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्याबरोबरच ज्या बिल्डिंगमध्ये कोविड रुग्ण आढळून येतील, त्यामधील सर्व नागिरकांचे टेस्टिंग करण्यात येणार असल्याचे डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली आहे. काही ठिकाणी टेस्टिंगला विरोध होत आहे. मात्र नागरिकांनी टेस्टिंगला विरोध न करता येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, अन्यथा येत्या काळात कठोर पाऊलं उचलावी लागतील, असा इशारा महापालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे .तसंच कंटेन्मेंट झोनमध्ये कठोर कारवाई करावी लागेल. लग्नसमारंभ आणि पार्ट्यांवरही अत्यंत कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचं सूर्यवंशी यांनी सांगितलं. येत्या आठवड्याभरात कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी न झाल्यास कठोर निर्णय घेण्याचा इशारा महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिला आहे.

बीडच्या माजलगाव तालुक्यातील पात्रुड इथे लहान भावाने मोठ्या भावाचा खून केल्याची घटना घडली आहे. यानंतर आरोपी स्वत: पोलीस ठाण्यात हजर झाला. अनेक दिवसापासून जागेच्या भाड्यावरुन या दोन भावांमध्ये वाद सुरु होते, त्या वादाचं रुपांतर आज मोठ्या भांडणात झालं. त्यामधूनच आज संध्याकाळी सातच्या सुमारास शेख हर्षद शेख शकील या छोट्या भावाने शेख इर्शाद शेख शकील याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत खून केला.
जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने वर्धा जिल्ह्यात महिलांना कोविड लसीकरणासाठी विशेष राखीव सत्र ठेवण्यात आलं.. यावेळी 220 महिलांनी कोविडची लस घेतली..जिल्ह्यातील भिडी ग्रामीण रुग्णालय, सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय, खरांगणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हे लसीकरण करण्यात आलं.. जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लसीकरणाला सुरुवात करण्यात आली.. महिला दिन असल्याने काही वेळ महिलांना लसीकरणासाठी राखीव ठेवण्यात आला होता.
अधिवेशनाच्या अखेरच्या दोन दिवसांत अध्यक्षपदाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. उद्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहिर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्या सकाळी तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते निर्णय घेऊन कार्यक्रम जाहिर करणार आहेत. शिवसेना आमदारांना पक्षाकडून व्हीप देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस सभागृह संपेपर्यंत उपस्थिती महत्वाची असणार आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे नेते होते आग्रही आहेत.
प्रादेशिक हवामान केंद्र, नागपुर यांनी वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात 10, 11 व 12 मार्चला तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता आहे. तसेच 12 मार्चला जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची अधिक शक्यता आहे. यादरम्यान शेतकऱ्यांनी स्वत:ची व पशुधनाची यथायोग्य काळजी घ्यावी तसेच परिपक्व झालेल्या पिकांची त्वरित कापणी करावी व कापणी केलेल्या शेतमालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. साठवणूक करणे शक्य नसल्यास शेतातील शेतमाल प्लास्टिक शीटने झाकून ठेवावा, जेणेकरून अवकाळी पावसापासून संबंधित शेतमाल खराब होणार नाही, असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र, बुलढाणा यांनी केले आहे.
कोरोनाचा चा वाढता प्रादुर्भाव पाहता पालघर जिल्ह्यात पुढील काळात होणाऱ्या यात्रा तसेच उत्सव यांच्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून पुढील आदेश येईपर्यंत जिल्हाधिकार्‍यांनी हे निर्देश दिले आहेत . पालघर जिल्ह्यातील तीळशे आणि डहाणू तालुक्यातील विवळवेढे महालक्ष्मी येथे मार्च , एप्रिल महिन्याच्या सुमारास भव्य अशा यात्रा सुरू होतात . या यात्रांमध्ये राज्यासह गुजरात , राजस्थान , दिल्ली या परराज्यातूनही लाखो भाविक दर्शनासाठी येतात . गर्दी जमल्यास येथील कोरोनाचा वाढणार असल्याची भीती असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हे निर्देश दिले आहेत . त्यामुळे हनुमान जयंती निम्मित पंधरा दिवसांसाठी राज्यासह परराज्यात प्रसिद्ध असलेली महालक्ष्मी यात्रा यावर्षी रद्द होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची सहा विभागस्तरीय कार्यालये जागतिक महिला दिनाच्या दिवशी कार्यान्वित झाली आहेत. आतापर्यंत राज्यभरातील महिलेला न्याय मिळविण्यासाठी मुंबईत येऊन महिला आयोगाकडे तक्रार करावी लागत होती. मात्र, अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास मदत व्हावी यासाठी राज्य महिला आयोगाची कार्यालये सर्व विभागीय आयुक्तालय मुख्यालयांच्या ठिकाणी सुरू होतील. पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि कोकण विभागस्तरावर ही कार्यालये महिलादिनी कार्यान्वित करण्यात आली. मुलुंड येथील विभागीय उपायुक्त कार्यालयात पहिल्या विभागीय कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्य महिला आयोग सदस्य सचिव अनिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं.
खोपोली कामशेत मिसीगं लेन पूल बांधकाम ठिकाणी अपघातात १ ठार २ जखमी. खोपोली एक्झीट ते कामशेत निर्माणाधीन बोगद्याच्या मार्गावरील पुलाच्या बांधकाम ठिकाणी अपघात. ऍफकॉन ईन्फ्रास्ट्रक्चर लिमीटेड या कंपनीचे काम सुरू. खोपोली एक्झीट जवळ झाला अपघात. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वर्षा बंगल्यावर महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे बैठकीला उपस्थित आहेत. तर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांनी बैठकीला हजेरी लावली आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गालगत असलेल्या पुलाचा लोखंडी सांगाडा कोसळला. बोरघाटातील ढेकू गावाजवळ सुरू असलेल्या पुलाचा लोखंडी सांगाडा कोसळला. 4 ते 5 कामगार गंभीर जखमी असल्याची शक्यता.
नाशिक मधील वाढत्या रुग्णसंख्याबाबत प्रशास काही कठोर पाऊलं उचलण्याच्या तयारीत. सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक सुरू. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, ग्रामीण पोलीस अधीक्षक, जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित
अमरावती जिल्ह्यात आज दिवसभरात 462 नव्या कोरोना रुग्णांची नोंद. आज 7 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात एकूण रूग्णांची संख्या पोहचली 39 हजार 986 वर.
मालेगाव शहरात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता महापालिकेच्या महापौर ताहेरा शेख यांनी मोठी घोषणा. शहरातील सर्व महाविद्यालय, शाळा, कोचिंग क्लासेस उद्यापासून बंद ठेवण्याचे आदेश. मालेगावमध्ये सध्या 350 पेक्षा जास्त अॅक्टिव्ह रुग्ण संख्या.
कोल्हापूर शहरानजिक जयंती नाल्यात मगरीचं दर्शन,

निकमांच्या घान्याच्या शेजारी 6 फुटाची मगर दिसली,

परीसरातील नागरिकांत भीतीचं वातावरण
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींवरुन राज्यसभेत विरोधकांनी गोंधळ घातला. इंधनाच्या दरवाढीसंदर्भात तात्काळ चर्चा घेण्याची मागणी काँग्रेसने केली. यावेळी विरोधकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली
आज सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये कपात करुन राज्य सरकार जनतेला दिलासा देण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून व्हॅटबरोबरच पेट्रोल आणि डिझेलवर विविध बाबींसाठी सेस आकारला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किंमती वाढल्या किंवा केंद्र सरकारने त्यामध्ये वाढ केली की राज्य सरकारला मिळणाऱ्या व्हॅटच्या टक्केवारीमध्येही वाढ होते.
आज सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये कपात करुन राज्य सरकार जनतेला दिलासा देण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून व्हॅटबरोबरच पेट्रोल आणि डिझेलवर विविध बाबींसाठी सेस आकारला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किंमती वाढल्या किंवा केंद्र सरकारने त्यामध्ये वाढ केली की राज्य सरकारला मिळणाऱ्या व्हॅटच्या टक्केवारीमध्येही वाढ होते.
अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी दोन वाजता विधानसभेत सादर करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.
अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी दोन वाजता विधानसभेत सादर करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी विधानभवन परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.
रायगड-

मुंबई- पुणे एक्सप्रेस मार्गावर मोठी दुर्घटना टळली....

पुण्याहुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ढेकूजवळ खासगी बसचा अपघात...

सुमारे 60 फुट खोल दरीत कोसळताना बस बचावली, सर्व प्रवासी सुखरुप...

बोरघाट उतरताना खोपोलीजवळ अपघात
अधिवेशन दुसऱ्या आठवड्यासाठी 2746 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती

त्यातील 36 जण कोरोना बाधित असल्याचे आढळले आहेत
संत तुकोबांच्या देहूतील गाथा मंदिरात 18 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. हे सगळे मंदिराचे पहारेकरी आणि कर्मचारी आहेत. त्यामुळे गाथा मंदिर दोन दिवसांपासून दर्शनासाठी बंद करण्यात आलंय. तुकोबांचे मंदिर मात्र दर्शनासाठी खुलेच आहे. येत्या 30 मार्चला तुकाराम बीज आहे, त्यावर आता निर्बंध येणार हे उघड आहे.
नागपूर येथील हिंगणा midc परिसरात विको कंपनीला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या सहा गाड्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. आगीचे कारण अजून स्पष्ट नाही. रात्री 2 च्या सुमारास लागलेली आग पहाटे जास्त भडकली.
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री महापौर बंगलाआणि CST रेल्वे स्टेशन आकर्षक गुलाबी रंगातील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचे निवासस्थान गुलाबी रंगातील विद्युत रोषणाई करून महिला दिवस निमित्ताने सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आला आहे.

मध्य रेल्वेच्या ठाणे- दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी पहिल्या टप्प्यातील गर्डरचे यशस्वी लॉंचिंग करण्यात आले आहे. या कामासाठी विशेष तज्ञ असलेल्या "आसाम" राज्यातील पथकाला बोलवण्यात आले होते. या कामगारांना यातील बारीक खुणा माहीत असल्याने युद्धपातळीवर त्यांनी यशस्वीरित्या गर्डर बसवण्यात यश मिळवले. यावेळी तब्बल 24 तास मुंब्रा बायपास बंद ठेवण्यात आला असल्याने रात्री 12 वाजता सुरू झालेले हे काम दुसऱ्या दिवशी रात्री 8 वाजता संपले असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान या कामासाठी 150 हुन अधिक मनुष्यबळ युद्धपातळीवर तैनात करण्यात आले होते
नांदेड जिल्ह्यात 8 मार्च सकाळी 6 वाजल्यापासून ते 22 मार्च, 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात सोमवार 8 मार्च 2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 22 मार्च 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

पार्श्वभूमी

आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार


 


आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अशा वेळी मोठ्या खर्चाला कात्री लागण्याची शक्यता आहे. पण जनतेला काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी 2 वाजता विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि अन्य योजनांबाबत चर्चा करण्यासाठी काल मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.





मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात आज महत्वाचा दिवस


 


 संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाचा दिवस आहे. सोमवारी सकाळी 10.30 वाजता सुप्रीम कोर्टाच्या कोर्ट नंबर 7 मध्ये मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणीला सुरूवात होत आहे. 5 फेब्रुवारीला या प्रकरणात शेवटची सुनावणी झाली होती, त्यावेळी कोर्टाने 8 मार्च ते 18 मार्च असे वेळापत्रक सुनावणीसाठी आखलेलं आहे. पण, दरम्यानच्या काळात हे प्रकरण अकरा न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे चालवण्यात यावे अशी याचिका राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली आहे.





मनसुख हिरेन प्रकरणी एटीएसकडून हत्येचा गुन्हा दाखल


 


मनसुख हिरेन प्रकरणी महाराष्ट्र एटीएसने हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या फिर्यादीवरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, आज एटीएसचं पथक मनसुख हिरेन यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झालं होतं. त्यावेळी मनसुख हिरेन यांची आत्महत्या नसून हत्या झाली असल्याचा आरोप हिरेन यांच्या कुटुंबियांनी केला होता. आज अखेर विमला हिरेन यांच्या फिर्यादिवरुन मनसुख हिरेन प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





अभिनेते मिथुन चक्रवर्तींचा नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश


 


बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या बऱ्याच दिवसांपासून मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आज अखेर अधिकृतपणे मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांनी कोलकाताच्या ब्रिगेड मैदानामध्ये पंतप्रधान मोदींच्या रॅलीमध्ये मंचावर भाजपचा झेंडा फडकावत पक्षप्रवेश केला. या दरम्यान बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष आणि कैलास विजयवर्गीय मंचावर उपस्थित होते.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.