Special Report : कोण शूर्पणखा, कोण ब्लॅकमेलर? चाकणकर विरुद्ध वाघ विरुद्ध विद्या चव्हाण
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्त होणार हे मला माहिती नाही, त्या पदावर कोण येतंय हेही महत्त्वाच नाही. तर महिलांना न्याय मिळणं महत्त्वाचं आहे असं मत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना आपण 'शूर्पणखा' म्हटलं नाही असंही चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं.
राज्य महिला आयोगासाठी अध्यक्ष लवकर नेमावा, पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका अशा प्रकारचं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलं होतं. त्यांचा रोख हा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याकडे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली होती. त्यावर बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या की, "राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अद्याप कोणाच्याही नावाची घोषणा झाली नाही. मी फक्त एवढंच म्हटलं त्या पदावर जे कोणी बसेल त्यांनी शूर्पणखाच्या भूमिकेत जाऊ नये. कोणीही तिथे बसेल त्यांनी रावणाला साथ देऊ नये. आता माध्यमांनी याचा चुकीचा अर्थ घेत ते रुपाली चाकणकरांना उद्देशून असल्याच्या बातम्या चालवल्या. पण मी कोणाचंही नाव घेतला नाही."
राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना चित्रा वाघ म्हणाल्या की, कामावर टिप्पणी करा, वैयक्तिक आयुष्यावर टिप्पणी केल्यास खपवून घेतली जाणार नाही. विद्या चव्हाण यांनी पुरावे दिल्यास आपण राजीनामा देऊ असंही त्या म्हणाल्या. नवरात्र सुरु आहे पण मात्र सरकार महिलांच्या सुरक्षा साठी काही करत नाही असंही त्या म्हणाल्या.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी नियुक्ती केली जाणार असून त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.