Bangladeshi Ladki Bahin | भारतात बांगलादेशी लाडकी बहीण, नेमकं प्रकरण काय? Special Report
Continues below advertisement
‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’ लाभ राज्यातील कोट्यवधी महिलांना मिळाला. आणि या योजनेमुळं राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमतही मिळालं. त्यामुळं लाडकी बहीण योजना सातत्यानं चर्चेत असते. पण याच योजनेबद्दल एक धक्कादायक माहिती हाती आली आहे. एका बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा संशय आहे. त्यादृष्टीनं तपास करावा लागेल, असं मुंबई पोलिसांनी सांगितलं आहे. मुंबई पोलिसांनी पाच बांगलादेशी नागरिकांसह एका दलालाला अटक केली आहे. त्यापैकी एका बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचा संशय आहे. दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली.
Continues below advertisement