Special Report : कुठला साखर कारखाना चांगला, कुठला वाईट? कारखान्यांचं मानांकन दरवर्षी जाहीर होणार
राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्यातील खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांचे मानांकन जाहीर केले आहे. शेतकऱ्यांचा ऊस घेऊन नंतर त्यांची फसवणूक करणाऱ्या साखर कारखान्याचा खरा चेहरा शेतकऱ्यांसमोर यावा यासाठी गायकवाड यांनी पुढाकार घेऊन हे मानांकन तयार केले आहे. या मानांकनात काही माजी मंत्री माजी मंत्री आणि आमदारांच्या साखर कारखान्यांना लाल फुली अर्थात वाईट साखर कारखाना असा शेरा मिळाला आहे. यात अजित पवार यांच्याशी निगडीत आहे म्हणून ईडीची कारवाई झालेल्या गुरू कमोडीटीच्या ताब्यातील जरंडेश्वरलाही एकदा लाल फुली मिळाली आहे राज्य सरकारनं गळीत हंगामासाठी तयार असलेल्या 190 कारखान्यांची नियमित ऊसदर देणे विलंबाने ऊसाची रक्कम देणे आणि वेळेत ऊस दर न दिल्याने झालेली कारवाई यांनी कशा आधारे चांगला मध्यम वाईट अशी वर्गवारी केली आहे या वर्गवारी मध्ये 190 साखर कारखान्यांपैकी सहकार आणि खाजगी असे ५७ कारखाने शेतकऱ्यांची देणी वेळेवर देतात तर 44 कारखाने शेतकऱ्यांची कोणत्या ना कोणत्या मार्गाने फसवणूक करतात असं दिसून आले आहे.
All Shows
































