Special Report on Sharad Pawar vs Vinod Tawade : पवारांच्या शाहांवरील टीकेला तावडेंचं तिखट उत्तर
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSpecial Report on Sharad Pawar vs Vinod Tawade : पवारांच्या शाहांवरील टीकेला तावडेंचं तिखट उत्तर
शरद पवारांनी अमित शाहांना तडीपारीची आठवण करुन दिल्यानंतर आज भाजपने पवारांना उत्तर दिलंय. विनोद तावडेंनी ती जबाबदारी कशी उचलली पाहुयात
एकीकडे, गल्लीपासून दिल्लीचं राजकारण कोळून प्यायलेले शरद पवार.... तर दुसरीकडे, राजकारणातले चाणक्य अशी ख्याती असलेले अमित शाह... या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांपैकी कुणाचं राजकारण सर्वाधिक नैतिक आणि कुणाचं अनैतिक? हा प्रश्न आम्ही विचारत नाही आहोत... तर या दोन्ही नेत्यांनीच एकमेकांवर टीकाटीपण्णी करतानाच हा मुद्दा जन्माला घातलाय.. शरद पवारांचं दगाफटक्याचं राजकारण असतं असा आरोप अमित शाहांनी केला.. तर त्याला प्रत्युत्तर देताना शरद पवारांनी अमित शाहांवर केलेल्या तडीपारीच्या कारवाईची आठवण केली..