Special Report | तोकडे कपडे घातल्यानं तरुणींची छेडछाड, अशा तालिबानींना धडा शिकवा!
केवळ तोकडे कपडे घातल्याचं कारण काढत मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेल्या दोन तरूण आणि दोन तरुणींना त्या ठिकाणी असलेल्या 6 ते 8 टवाळखोर मुलांनी बेदम मारहाण केली. हे तरुण इथेच थांबले नाही, तर त्यांनी दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला. ही निंदनीय घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या या चौघांनी स्वतः ची सुटका करून घेत नेवाळी पोलीस चौकी गाठली. मात्र पोलिसाकडून त्यांना मेडिकल करून या तसेच इथे तक्रार होणार नाही, हिललाईनला जा असे सांगत माघारी धाडले. मात्र यातील पीडित तरुणीने हिम्मत न हारता सोशल मिडीयावरून या घटनेला वाचा फोडताच जागे झालेल्या पोलिसांनी याप्रकरणी मंगळवारी संध्याकाळी उशिरा गुन्हा नोंदवला असून सध्या आरोपींचा शोध सुरु केला आहे.
All Shows

































