Special Report : गंभीर जखमी गोविदांना साडेसात लाखांची मदत,एकनाथ शिंदेची मोठी घोषणा :ABP Majha
दहीहंड्यांसाठीच्या रोख इनामातून वाचलेली रक्कम कल्याण डोंबिवली महापालिकेला खड्डे बुजवण्यासाठी देणगी म्हणून देण्याची अनोखी घोषणा कुणाल पाटील फौंडेशनच्या वतीनं करण्यात आली आहे. कल्याण डोंबिवलीत गणेशोत्सवादरम्यान खड्ड्यांचं विघ्न येऊ नये म्हणून फौंडेशनचे अध्यक्ष कुणाल पाटील यांनी ही घोषणा केली आहे. कल्याण पूर्व येथील आडिवली ढोकळी परिसरात कुणाल पाटील फौंडेशन आणि विजय पाटील मित्र मंडळाच्या वतीनं दहीहंडीचे आयोजन करण्यात आलं आहे. या दहीहंडीतल्या गोविंदा पथकांना एकूण दहा लाख रुपयांचं रोख इनाम देण्यात येणार आहे. त्यापैकी ५० हजार ते एक लाख रुपयांची रक्कम ही कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील खड्डे बुजवण्यासाठी देण्याची अनोखी घोषणा करण्यात आली आहे.
All Shows































