Solapur : दूध आणायला गेला...गुन्हा दाखल झाला..दाखल गुन्ह्यांमुळे राकेश कुरापाटीचं भवितव्य टांगणीला
आफताब शेख, एबीपी माझा
Updated at:
10 Aug 2021 09:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यभरात कोरोना काळात नियमांचे उल्लघंन करणाऱ्या हजारो व्यक्तींविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईद्वारे केवळ कोट्यावधींचा दंडच वसूल केला गेला नाही तर हजारो लोंकावर पोलिसांनी गुन्हे देखील दाखल केले गेले आहेत. यामध्ये प्रामुख्याने भांदवि कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दाखल झालेल्या गुन्ह्यांमुळे आता सर्वसामान्यांना त्रास देखील सहन करावा लागतोय.