Solapur Funeral Special Report : वाहत्या नदीतून अंत्ययात्रा का काढावी लागली ?
abp majha web team
Updated at:
10 Aug 2022 11:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमागील काही दिवसांपासून राज्यात सर्वदूर पाऊस आहे. या पावसामुळे अनेक गावांना फटका बसलाय. दुष्काळी जिल्हा अशी ओळख असलेल्या सोलापुरातल्या अक्कलकोटमध्ये दरवर्षी पिण्याच्या पाण्याचा देखील प्रश्न उभा राहतो. यंदा मात्र अक्कलकोटला देखील पावसाने झोडपलय. मात्र या पावसामुळे आपली व्यवस्था किती कमकुवत आहे हे समोर आलंय. अक्कलकोटच्या हरणा नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानं पितापुर गावातील एका व्यक्तीची अंत्ययात्रा चक्क पाण्यातून काढावी लागली. रौद्र रुप धारण केलेल्या हरणा नदीतून ग्रामस्थांना पोहत मृतदेह घेऊन वाट काढावी लागली.