Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी
Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी
राज्य सरकारने शनिवारी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची यादी जाहीर केली. यात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा पत्ता कट करण्यात आला आहे. बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. यावरून विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता धनंजय मुंडे यांना पालकमंत्रिपदापासून दूर ठेवण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोपवण्यात आले आहे. आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन दिवसांचे ‘नवसंकल्प शिबिर’, शनिवारपासून शिर्डी येथे सुरू झाले आहे. यासाठी राज्यातील पक्ष, आघाडी आणि विविध सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झाले आहेत. आज माध्यमांशी बोलताना खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आणि मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत महत्त्वाचं भाष्य केलंय.