Saif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?
Saif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?
Saif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला केल्यानंतर आरोपीने वांद्रेतील निवासस्थानावरुन पळ काढला. त्यानंतर 8 वाजता आरोपी दादरला गेला, त्यानंतर तो वांद्रेला पोहोचला. त्यानंतर तो सेंट्रल लाईनच्या दिशेने जाताना दिसला. यानंतर पोलिसांनी सेंट्रल भागातून आरोपीची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या मोबाईलचं शेवटचं लोकेशन ठाणे दाखवलं.
घटनेपूर्वीच्या 10 ते 15 दिवसांपूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं
आरोपीचा शोध घेण्यासाठी, मुंबई पोलिसांनी केवळ घटनेच्या दिवसांचं नाही, तर घटनेपूर्वीच्या 10 ते 15 दिवसांपूर्वीचं सीसीटीव्ही फुटेज देखील स्कॅन केले. या फुटेजच्या स्कॅनिंग दरम्यान, डीएन नगर परिसरातील एक फुटेजमध्ये अंधेरीतील एका व्यक्ती दिसली. मुंबई पोलिसांना एक सीसीटीव्ही मिळाला, ज्यामध्ये एक बाईकस्वार डीएन नगर परिसरात एका व्यक्तीला खाली सोडत आहे. बारकाईने विश्लेषण केल्यावर असे आढळून आलं की, बाईकवरून खाली उतरणारा व्यक्ती सैफ अली खानचा हल्लेखोर आहे. त्यानंतर बाईकच्या नंबरची माहिती काढण्यात आली आणि पोलिसांना एकामागून एक लीड मिळू लागले.
पोलिसांनी लपून बसलेल्या हल्लेखोराला कसं शोधलं?
सुरुवातीच्या तपासात आरोपीकडे मोबाईल फोन नाही, असं वाटत होतं. कारण त्याचा मोबाईल नंबर सापडत नव्हता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रात्री सापडलेल्या फुटेजमध्ये आरोपी फोनवर बोलताना दिसला. सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी फोनवर बोलतो आणि पुढे जातो. त्यानंतर पोलिसांनी रात्रीच्या वेळी त्या भागात असलेला मोबाईल फोनचा डेटा काढला. मध्यरात्रीची वेळ असल्याने त्यावेळी जास्त लोक फोन कॉल करत नसल्याने त्याचा मोबाईल नंबर शोधणं पोलिसांसाठी सोपं झालं.