Sheetal Mhatre Special Report : व्हिडीओ खरा की खोटा? व्हायरल व्हिडीओवर प्रकाश सुर्वे शांत का?
शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी एकीकडे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे.. तर दुसरीकडे आरोपांच्या फैरीही झडतायत... आज याप्रकरणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आज चांगलेच आक्रमक झाले... हा व्हिडीओ त्या आमदाराच्या मुलाने फेसवुकवरून डिलीट का केला, त्याची चौकशी करावी, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केलीय...तर ठाकरे गटाच्या युवासेनेचे वरुण सरदेसाईंनीही प्रकाश सुर्वेंचे चिरंजीव राज सुर्वे यांच्याकडे बोट दाखवलंय. तर, व्हिडीओतले पुरूष आमदार कुठे आहेत?, त्यांची काही तक्रार आहे का?, हेही पाहा... असं म्हणत संजय राऊत यांनी या व्हिडीओ प्रकरणाला वेगळाच अँगल दिलाय.
All Shows

































