Rishab Pant Accident Special Report : ऋषभ पंतच्या अपघातामुळे BCCI चिंतेत, काय आहे कारण?
abp majha web team
Updated at:
30 Dec 2022 09:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतीय संघाचा क्रिकेटपटू ऋषभ पंत याच्या कारचा भीषण अपघात झालाय... अपघातात ऋषभ जखमी झाला असून त्याच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झालीये.. त्याच्यावर सध्या देहरादूनमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत... हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये कार जळून खाक झालीये... दिल्लीहून परतताना देहरादूनमधील हम्मदपूरजवळ हा अपघात झाला... कार चालवताना ऋषभला झोप लागल्याने अपघात झाल्याची माहिती समोर आलीये.. दरम्यान गरज पडल्यास त्याला दिल्लीला एअरलिफ्ट केलं जाणार असल्याची माहिती देहरादूनच्या मुख्यमंत्र्यांनी दिलीये..