Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie Report

Continues below advertisement

Saif Ali Khan Attacker Arrest सैफचा आरोपी 'या' लेबर कँपमध्ये लपला होता, 'माझा'चा Exclusvie Report

अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी रात्री वांद्रे येथील निवासस्थानी घरात शिरलेल्या चोराने जीवघेणा हल्ला केला होता. या चोराने सैफच्या अंगावर धारदार सुऱ्याने सहा वार केले होते. सुऱ्याचे पाते सैफच्या पाठीत रुतून बसले होते. तसेच त्याच्या मानेवर खोल जखम झाली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. सैफ अली खानसारख्या सेलिब्रिटीवर हल्ला झाल्याने मुंबई पोलिसांची अनेक पथकं कामाला लागली होती. पोलिसांनी त्यांच्या खबऱ्यांचे नेटवर्क आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून अक्षरश: सुतावरुन स्वर्ग गाठला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सैफवरील हल्ल्याची घटना समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने त्याची इमारत आणि आजुबाजू्च्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले होते. मात्र, त्यामधून कोणताही महत्त्वाचा धागा सापडला नव्हता. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सैफ अली खानवर हल्ला होण्यापूर्वी 10 ते 15 दिवस आधीचे सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासले. हे फुटेज स्कॅन करण्यात आले तेव्हा अंधेरीच्या डीएन नगर परिसरात एक बाईक दिसून आली होती. या बाईकवरुन एका व्यक्तीला ड्रॉप करण्यात आले होते. या व्यक्तीचा चेहरामोहरा हा सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीशी मिळताजुळता असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे पोलिसांना या बाईकची नंबरप्लेट तपासली आणि तिथून याप्रकरणाचे धागेदोरे उलगडत गेले, अशी माहिती समोर आली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram