Ramleela Mandal Special Report : 'शिवसेनेकडून मैदान रिकामं करण्याचा दबाव' , मंडळाचा शिवसेनेवर आरोप
abp majha web team | 21 Oct 2023 11:37 PM (IST)

दरवर्षी मुंबईच्या आझाद मैदानात होणारा रामलीला सोहळा हा मुंबईकरांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु...मात्र, यंदा शिवसेनेच्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याची झळ थेट ‘रावणदहना’ला बसलीये. कारण जिथे रावणदहन केलं जातं तिथेच शिंदे गटाचा दसरा मेळावा होणारेय.. आणि यासाठीच मैदान रिकामं करण्याचा दबाव शिंदे गटाकडून टाकला जात असल्याचा आरोप होतोय.