
Manoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा
Manoj Jarange On Mumbai : मुंबई जाम होणार मराठा मागे येणार नाही, जरांगेंचा इशारा
मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांचं उपोषण अखेर आज स्थगित करण्यात आलं आहे. सरकारचे प्रतिनिधी म्हणून अंतरवाली सराटीत आलेल्या आमदार सुरेश धस यांच्याहस्ते ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण स्थगित करत असल्याची घोषणा केली. मात्र, याचवेळी सरकारने आमच्या मागण्यांसदर्भात लवकरच निर्णय न घेतल्यास पुढील आंदोलन राजधानी मुंबईत करणार असून त्याचीही घोषणा केली जाईल, असा इशाराच सरकारला दिला आहे. आमदार सुरेश धस (Suresh dhas), खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार प्रकाश सोळुंके यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे यांनी ज्यूस पिऊन उपोषण सोडले. यावेळी, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख हेही उपस्थित होते. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण सोडण्यापूर्वी धनंजय देशमुख यांना आपल्या हाताने पाणी पाजलं.
मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित करण्यापूर्वी उपस्थितांना व राज्यातील मराठा बांधवांना उद्देशून भाषण केलं. काही लोक म्हणत आहेत की मनोज जरागेंच्या उपोषणातून काय मिळाल, पण त्यांचा 24 घंटे एकच धंदा आहे, त्यांना काही करायचे नाही. राज्य सरकारकडून शिंदे समिती पूर्णपणे बंद करण्यात आली होती. शिंदे समितीच्या मंत्रालयावरील ऑफिसला कुलूप लावण्यात आलं होतं, जे काय मिळालं म्हणत होते ना, घरात बसून नेत्यांचे पाय चांटणाऱ्यांना कळत नाही, असा टोला काही मराठा समन्वयकांना जरांगे पाटील यांनी लगावला. तसेच, आता शिंदे समिती राज्यात काम करणार आहे, पूर्ण राज्य आमचं आहे. पण, बीड आणि धाराशिव जिल्ह्यात काही अधिकारी जातीवादी आहेत, ते मराठा समाजातील तरुणांना प्रमाणपत्र देत नाहीत, त्यांना बडतर्फ केलेलच बर असे जरांगे पाटील यांनी म्हटले.