Rajyasabha राज्यसभेत संभाजीराजेंना बोलू न दिल्याने ड्रामा,संजय राऊत संभाजीराजेंच्या मदतीला धावले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Aug 2021 11:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरक्षण विधेयकावर खासदार संभाजीराजे छत्रपतींना बोलू न दिल्यानं जबरदस्त ड्रामा पाहायला मिळाला. राज्यसभेत संभाजीराजे छत्रपतींच्या मदतीला शिवसेना खासदार संजय राऊत धावून आले. रितसर विनंती करुनही भाजपच्या यादीत वक्ता म्हणून संभाजीराजे यांचं नाव नव्हतं. त्यामुळं चर्चा संपत असताना म्हणजेच विरोधी पक्षनेते बोलण्याच्या आधी संभाजीराजे उठून उभे राहिले आणि त्यांनी आपला निषेध नोंदवला. त्यावेळी संजय राऊत संभाजीराजेंच्या समर्थनात उभे ठाकले. अखेर तालिका सभापतींनी संभाजीराजेंना बोलण्यासाठी दोन मिनिटांची वेळ दिली.