Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 1 PM :18 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराहुल गांधींनी 'एक है तो सेफ है'ची पत्रकार परिषदेत उडवली खिल्ली, तिजोरीतून काढले मोदी-अदानी आणि धारावीचे पोस्टर
धारावीची जमीन हिसकावून अदानींना देण्यात येतेय, अदानींना पंतप्रधान मोदींचा पूर्ण पाठिंबा आहे, राहुल गांधींचं वक्तव्य.
महाराष्ट्रातून सात लाख कोटींचे आठ प्रकल्प गुजरातला गेले, ५ लाख युवकांचा रोजगार बुडाला, राहुल गांधींचा आरोप
सरकार आल्यानंतर अदानींसोबतचे सर्व करार रद्द करणार, उद्धव ठाकरेंची घोषणा, राहुल गांधी उद्धव ठाकरेंच्या मताशी सहमत.
काँग्रेसच्या घोटाळ्याचा इतिहास कंटेनरमधून काढला पाहिजे, गांधी घराण्याने आणि काँग्रेसने महाघोटाळे केलेत, राहुल गांधींच्या आरोपांवर प्रसाद लाड यांचा पलटवार
मेट्रोचं काम पूर्ण होण्याआधीच पिलर्सला रंगरंगोटी करण्यात ७४ कोटींची उधळपट्टी, आदित्य ठाकरेंचा आरोप, मविआचं सरकार आल्यावर घोटाळ्याची चौकशी करणार, आदित्य ठाकरेंचा इशारा.
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महायुती मविआत जाहिरात युद्ध, वृत्तपत्रांमध्ये भाजपकडून से नो टू काँग्रेस अशा जाहिराती, तर काँग्रेसकडून "महाअभद्र युतीचा महाअभद्र कारभार, हद्दपार करू भ्रष्टयुती सरकार अशा आशयाची जाहिरात.
महायुतीचीच जाहिरात खरी, मविआची जाहीरात खोटी, आपापसातल्या वादामुळे मविआ मागे पडली, बावनकुळेंचं वक्तव्य, महायुतीला 160 च्या वर जागा मिळतील, बावनकुळेंचा विश्वास.
उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून एक्स पोस्टच्या माध्यमातून विकासकामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न, जे बोलतो, ते करून दाखवतो! अशा आशयाची पोस्ट.