Raj Thackeray Speech Shivdi : उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? शिवडीत राज ठाकरेंचा हल्लाबोल

Continues below advertisement

Raj Thackeray Bala Nandgaonkar मुंबई: बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांना व्हीलचेअरवर बघून मला जनता पक्षाचा काळ आठवला. जयप्रकाश असेच भाषण करायचे. विधानसभेची आज माझी ही शेवटची सभा आहे. प्रत्येकवेळी शेवटची सभा इकडेच असते. 20 तारखेला मतदान असणार आहे. त्यावेळी 2 नंबरवर असलेल्या बाळा नांदगावकरांना एक नंबरवर आणायची जबाबदारी तुमच्यावर आहे, असं मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितलं. शिवडीतील उमेदवार बाळा नांदगावकर यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंनी आज जाहीर सभा घेतली. 

राज ठाकरेंनी भाजप अन् शिवसेना शिंदे गटाचे मानले आभार

शिवडी विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने आमच्या बाळा नांदगावकर यांना पाठिंबा दिल्याने मी त्यांचे आभार मानतो. असे आभार अनेक मतदार संघात मानता आले असते... पण जाऊदेत, असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्राचा एकोपा होता. पण आपण सर्व विसरलो, का तर यांच्या स्वार्थासाठी, असंही राज ठाकरेंनी सांगितले. 

उत्तर प्रदेश बिहारसारखे अवस्था महाराष्ट्रात होऊ नये- राज ठाकरे

2019 ला शिवसेना भाजपला लोकांनी मतदान केले आणि मग युती तोडून मुख्यमंत्रीपदासाठी ज्यांच्या विरोधात होते त्यांच्यासोबत गेले. हे कोणते राजकारण आहे?, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला. या महाराष्ट्रात जाती-जातीमध्ये लढत शरद पवारांनी घडवली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर हे सर्व सुरू झाले, असा आरोप राज ठाकरेंनी केला. तसेच राजकीय पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र जगला पाहिजे. उत्तर प्रदेश बिहारसारखे अवस्था महाराष्ट्रात होऊ नये, असं राज ठाकरे म्हणाले.

...मग उद्धव ठाकरे आडवा येतो कसा?; राज ठाकरेंचा हल्लाबोल

मी मशिदीवरचे भोंगे उतरविले...आले पण खाली आहे. हनुमान चालीसा म्हणणार होते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि माझ्या 17 हजार मानसैनिकांवर केसेस टाकल्या. बाळासाहेब ठाकरे स्वत: म्हटलं होते की भोंगे उतरवा आणि राज ठाकरे करतो...तर उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा?, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला. दरम्यान, गेल्या 5 वर्षात काय केले या सगळ्याची उजळणी करा..सर्व आठवा आणि  मग 20 तारखेला बाळा नांदगावकरांना मतदान करा...मनसेचे राज्यातील जे उमेदवार आहेत. त्यांना निवडून द्या..., असं आवाहन राज ठाकरेंनी केलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram