ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Raj Thackeray Special Report : Aaditya Thackeray यांच्या मतदारसंघात राज ठाकरे सक्रिय?

Raj Thackeray Special Report : Aaditya Thackeray यांच्या मतदारसंघात राज ठाकरे सक्रिय?

abp majha web team Updated at: 17 Sep 2024 12:04 AM (IST)

Sandeep Deshpande and Thackeray Group, मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे गटप्रमुख निलेश ठोंबरे यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांची भेट घेत असतानाच मोठा निर्णय घेतला. ठाकरेंच्या गट प्रमुखाने संदीप देशपांडे यांच्यासमोर शिवबंधन हातातून काढले आणि ऑन द स्पॉट राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्मान सेनेत प्रवेश केला. निलेश ठोंबरे यांनी संदीप देशपांडे यांच्या समोरच हातातून शिवबंधन काढले मनसे नेते संदीप देशपांडे हे वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. संदीप देशपांडे विरुद्ध  ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे अशी लढत वरळीमध्ये पाहायला मिळणार आहे. संदीप देशपांडे यांनी वरळीमध्ये गाठी भेटींना सुरुवात केली आहे. देशपांडे यांच्याकडून वरळीकरांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. या सगळ्या गाठी भेटीच्या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या गटप्रमुख निलेश ठोंबरे यांनी संदीप देशपांडे यांच्या समोरच हातातून शिवबंधन काढले आणि मनसेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसापासून वरळीमधले राजकीय वातावरण तापले आहे. जांभोरी मैदान येथे ठाकरे गटाचे शिवसैनिकांनी मनसे कार्यकर्ते आमने-सामने आले होते . त्यामुळे आगामी काळामध्ये वरळीमध्ये मनसे विरुद्ध ठाकरेंचे शिवसेना ही  विधानसभेची लढत चांगलीच चर्चेत राहणार आहे. मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये संघर्ष पेटला गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंच्या सैनिकांमध्ये मोठा वाद पाहायला मिळालाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ते शिवसैनिक होते, पण आम्ही या हल्ल्याचं समर्थन करत नाही असं म्हटलं होतं. मात्र, यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. उद्धव ठाकरे ठाण्यातील मेळाव्यासाठी जात असताना त्यांच्या कारवर शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्या. शिवाय ठाकरे ज्या कार्यलयात मेळावा घेणार होते, त्या कार्यालयातही मनसैनिक घुसले आणि त्यांनी राडा केला होता. मात्र, त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आले नाही.

TRENDING VIDEOS

Shambhuraj Desai Phone Call : कलेक्टरांना आलेला फोन शंभूराजेंनी उचलला, एका झटक्यात काम मार्गी52 Minutes ago

Pawar-Padalkar Controversy | 'मला अडकवण्याचा प्रयत्न', सत्य बाहेर आणण्यासाठी SIT ची मागणी!1 Hour ago

Kapil Sharma Cafe Attack | Salman Khan सोबत काम करणाऱ्यांना थेट गोळी, Harry Boxter ची धमकी1 Hour ago

VP Candidate | INDIA आघाडी NDA च्या उमेदवाराची वाट पाहणार.2 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.